छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) 'जनगणना २०२७ या महत्त्वाकांक्षी उपक्रमाच्या सुरुवातीलाच शहरात नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळत आहे. अवघ्या तीन दिवसांत १० हजाराहून अधिक नागरिकांनी पोर्टलवर स्वतःहून नोंदणी करत आपला सहभाग नोंदवला आहे. विशेष म्हणजे, यापैकी ७,६११ नागरिकांनी आपली सविस्तर माहिती
भरून नोंदणीची प्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण केली आहे. डिजिटल पद्धतीने मिळणारा हा प्रतिसाद प्रशारत्नासाठी अत्यंत समाधानकारक मानला जात आहे.
नागरिकांना मोबाईल अॅप आणि ऑनलाईन पोर्टलच्या सहाय्याने स्वतः ही माहिती नोंदविण्याची सुविधा देण्यात आली आहे. प्रशिक्षित कर्मचाऱ्यांच्या मदतीमुळे ही प्रक्रिया अधिक सोपी करण्यात आली आहे.
शहरात मोहिमेच्या पहिल्याच दिवशी १ मे रोजी २.९८५ नागरिकांनी स्वयं-नोंदणीस सुरुवात केली होती. त्यापैकी २,१८२ जणांनी प्रक्रिया पूर्ण केली, तर उर्वरितांची नोंदणी सुरूच होती,
पुढील दोन दिवसांत प्रतिसादात लक्षणीय वाढ होत नोंदणीचा आकडा १०,०७९ पर्यंत पोहोचला. यामध्ये अजूनही २,४६८ नागरिकांची नोंदणी प्रक्रिया प्रलंबित असल्याचे दिसून
मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी व्हावी
शहराचे १० स्वतंत्र मागांमध्ये विभाजन करण्यात आले आहे. प्रत्येक भागात सुमारे १२० ते १४० घरांचा समावेश असणार आहे. त्यामुळे प्रत्येक कर्मचाऱ्याला निश्चित कार्यक्षेत्र मिळून कामांची गती आणि अचूकता वाढण्यास मदत होणार आहे.
नागरिकांचे सहकार्य आवश्यक
जनगणना प्रक्रिया पारदर्शक आणि वेळेत पूर्ण करण्यासाठी नागरिकांनी स्वयं नोंदणी करताना अचूक माहिती भरावी, तसेच पडताळणीदरम्यान सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
१० टक्के अतिरिक्त मनुष्यबळ राखीव
जनगणना मोहिनेसाठी सुमारे ३.५०० कर्मचाऱ्याऱ्यांची गरज लक्षात घेऊन अतिरिक्त १० टक्के मनुष्यबळ राखीव ठेवण्यात आले आहे. त्यानुसार ३,७०० ते ३,८०० कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली नाणार असून यात शिक्षक, महापालिका कर्मचारी आणि विविध शासकीय विभागातील कर्मचान्यांचा समावेश आहे.
येते आहे. स्वयं-नोंदणीचा प्रारंभीचा पहिला टप्पा १५ मेपर्यंत चालणार आहे. त्यानंतर १६
मेपासून दुसऱ्या टप्याची अंमलबजावणी केली जाणार आहे.









